•  

  "Granthotsav", 2018.

  काही दिवसांपूर्वी, एका ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने, भाषणाची संधी मिळाली. ग्रंथांचं महत्त्व तर अगाध असच आहे. त्यावेळी मी माझ्याअनुभवातून काय शिकले त्याबद्दल केलेले कथन ह्या ब्लॉगमध्ये देत आहे. आवडल्यास जरूर कंमेंट द्या. किंवा शेअर करा. 

   

  प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार?

  औषधाशिवाय रोग कसा हटणार?

  प्रेमाशिवाय कलह कसे मिटणार ?

  आणि ग्रंथांशिवाय ज्ञान कसे मिळणार?

   

  ग्रंथांबद्द्लच जर सांगायचं झालं तर मी माझ्या मुलांना वाचनाची सवय लागावी म्हणून खूप मेहनत घेतली आहे आणि मला त्याचे चांगले फळ मिळाले आहे. माझा मुलगा ४ वर्षांचा असताना आणि मुलगी ६.५ वर्षांची असताना,  मी त्यांना त्यांच्या शाळे नंतर पुण्याला एका "ब्रिटिश लायब्ररीत"  नेत  असे आणि तेथे खूप छान वातावरण असायचं. लहान मुलांची छोटी छोटी पुस्तक, मोठ्या मोठ्या चित्रांची आणि मोठ्या मोठ्या अक्षरांची तिथे मस्त मांडून ठेवलेली असत, विविध सॉफ्ट टॉयज च्या राज्यात कुठेहि कोणत्याही मोठ्या सॉफ्ट टॉयवर अथवा बीन बॅग वर  बसून ही मुले वाचत असत आणि ती वाचताना कुठे अडखळली तर सांगण्यासाठी "वाचक मार्गदर्शक" उपलब्ध असत. त्यामुळे त्या छोट्या वयातच त्यांना खूप छान वाचता येत असे. आजही दोघेही  अवीड (Avid) रीडर आहे. 

   

  परंतु सांगायचं कारण असं  कि, पुढे २०११/१२ मध्ये मुंबई ला आल्यानंतर, नरिमन पॉईंट ला देखील एक ब्रिटिश लायब्ररी होती, खूप छान होती. अशीच होती जशी पुण्याला होती. खूप आनंद झाला होता, कि आता आमची वाचन चळवळ चालू राहील म्हणून. पण तो आनंद खूप दिवस टिकला नाही.  दोन  वर्षानंतर मला एक पत्र आलं लायब्ररीतुन कि आता लायब्ररी बंद होत असून यापुढे सगळी पुस्तके "इ-वाचना" साठी उपलब्ध असतील. त्यापुढील तीन दिवस मला स्वतःला काही सुचत नव्हतं. कि आता लायब्ररीत जाता येणार नाही, आता, तो नवीन पुस्तकांचा वास नाही, कॉफी पित पित वाचण्याचं सुख नाही, मुख्य म्हणजे मी लायब्ररीत बसून पुस्तकांची यादी बनवत असे, आता मला नवीन पुस्तक घेण्यासाठी संदर्भ मिळणार नाहीत, तुम्ही आला नाहीत पुस्तक घ्यायला म्हणून फोन कॉल येणार नाही, खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत.

   

  पण काही दिवसांनीच मला एक संधी चालून आली, एक संशोधन करण्याची, ते संशोधन होते माइंडफुलनेस (सजगता) आणि भावनिक बुद्धिमत्ता, यावर मला लिहायचे होते. ती एक ऑनलाईन परिषद होती,  मी लिहिलं  आणि ते माझे लिखाण नंतर, इ -बुक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले, ते

  इ -बुक आजही स्मॅश वर्ड्स वर उपलब्ध आहे. त्याच नाव आहे, "द माइंडफूल हार्ट".

   

  सांगण्याचा मुद्दा असा आहे कि मला जो अनुभव आला पुस्तक वाचनाचा लायब्ररीला भेट देऊन पुस्तक वाचण्याचा आणि नंतर एक्दम डिजिटली पुस्तक वाचनाचा आणि त्यातुन माझंच एक इ -पुस्तक बनण्याचा. तो सगळा अनुभव खूप मजेशीर होता. तो अनुभव म्हणजे माझ्या साठी एक अभ्यास होता. 

   

  दोन्ही प्रकारचे अनुभव मला त्यामुळे आले. आणि दोन्हीचे महत्त्व आणि तोटे समजले. 

  आणि मी जे त्यातून शिकले ते मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • पहिली महत्त्वाची गोष्ट मी अशी शिकले कि, किशोरावस्थे च्या पुढील वयाच्या व्यक्तींना ज्या काही प्रमाणात का होईना पण संगणकाशी नातं ठेऊन आहेत त्यांच्या साठी इ -वाचन अवघड नाही. 
  • इ- वाचनामुळे वाचता वाचता लागणारे संदर्भीय वाचनहि त्या सोबतच सहज करता येतात. 
  • आता नवीन ऍप्लिकेशन्स मुळे आपण तडक पुस्तक तयार करु शकतो. 
  • खूप साऱ्या पुस्तकांमधील उतारे आपण एका फाईल मध्ये जमा करून ठेऊ शकतो. 
  • एका छोट्याशा चिप वर  १५/२० हजार पेजेस आपण सहज ठेऊ शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. 
  • पुस्तकांवरची धूळ नाही कि, शिंका नाहीत कि, कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत. 
  • तयार झालेली माहिती वेळोवेळी कितीही वेळा पाठवता येते. त्यातच आपण ती दुरुस्तहि करू शकतो. आणि.
  • विशेष म्हणजे ती माहिती आपण काही शेकडो नाही, हजारो नाही तर, मिलिअन्स ऑफ मिलिअन्स लोकांना, लाखो लोकांना एका वेळी पाठवू शकतो, विविध भाषांमध्ये पाठवू शकतो आणि तेही निमिषार्धात, काही सेकंदात पाठवू शकतो. 
  • किंडल सारखे डिव्हाईस तर पुस्तकाचा पूर्ण फील देणारे आहेत. आपण आपल्यासोबत आवडणारी सगळी पुस्तक सोबत घेऊन जाऊ शकत नाही त्याला मर्यादा आहेत. ती जड होतात, जागा उरत नाही बाकीच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी,  पण किंडल द्वारे आपण, हवी ती पुस्तक सोबत नेऊ शकतो. 
  • एवढच नाही तर आता आपण इ-पुस्तक ऐकु सुध्दा शकतो. आता ऑडिओ पुस्तकेही उपलब्ध आहेत. 
  • आपण पर्यावरणासाठी खूप बहुमोल असे काम ई-पुस्तक वाचुन करू शकतोय आज. मी जर डिजिटल पुस्तक नसत लिहिलं तर मला न आवडणारी पाने फाडावी आणि फेकावी लागली असती. एक टन पेपर्स तयार करण्यासाठी १२ झाडे लागतात. म्हणजे आपण फेकलेले प्रत्येक पान हे झाडाच्या फांद्यांप्रमाणे आहेत असे लक्षात घेतले तर आपण सगळे मिळून इथे ह्या ठिकाणी एक जंगले उभे करू शकू इतकी झाडें वाचतील. 
  • एवढच नाही तर एकदा मजकूर, पुस्तक डिव्हाईस वर डाउनलोड केली, आपण ऍमेझॉन किव्वा गुगल च्या सर्च इंजिन वर त्या पुस्तकांची नावे लिहू शकतो अगदी, "मृत्युन्जय", सारखे पुस्तकहि डाउनलोड करता येत.  स्मार्ट फोन असेल, टॅब असेल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल, आणि आपण ते डिव्हाईस निट चार्ज केलेले जर असतील तर, इलेक्ट्रिसिटी सुद्धा इ -वाचनासाठी लागत नाही. आपण अंधारातही त्या त्या डिव्हाईस वरून वाचू शकतो. 

  -----------

  • हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेतच ह्या बरोबरच मी काही दुसऱ्या मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांचाही उहापोह करणार आहे. ते म्हणजे असे कि, वयाच्या आठ वर्षापर्यंतची  मुलं मुलीं जर दोन तास कॉम्पुटर युज करत असतील तर त्यापुढे वयाच्या दहाव्या वयापर्यंत ते सहा तास होतात, आणि कॉमन सेन्स मीडिया असे सांगतो कि अशा मुलांना कॉम्पुटर व्हिजन सिन्ड्रोम, ड्राय आईज, हेडेक, फटिक, नेक, शोल्डर, बॅक पेन, अनहेल्दि पोस्चर, नीअर साईटेडनेस--मायोपिया, असे अनेक त्रास संभवू शकतात. म्हणून, खूप जास्त कॉम्पुटर एक्सपोजर अगदी कमी वयात योग्य नाही. काही प्रमाणात मोठ्या पडद्यावर महत्त्वाचे शिक्षणाशी संबंधित असल्यास काही चित्र फिती आपण दाखवू  शकतो. त्याच बरोबर शारीरिक व्यायामही तेवढेच करून घेतले पाहिजेत. 
  • मध्ये मध्ये ब्रेक घेतले पाहिजेत. स्क्रीन पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. २०-२०-२० नियम  मुलांसाठी आणि प्रत्येकासाठी करायला हवा, प्रत्येक २० मिनिट्स नंतर स्क्रीन पासून डोळे दूर करायला हवेत २० फूट दूरचे २० सेकंदांसाठी पाहावे. हा आहे २०-२०-२० नियम. असे केल्याने खूप साऱ्या डिजिटल अनारोग्यापासून आपण स्वतःला आणि मुलांना दूर ठेऊ शकतो. 
  • जी सगळी मुले कॉम्पुटर वापरतात, शिकतात, त्यांनी, कंपलसरी डोळ्याचे व्यायाम हे केलेच पाहिजेत. तसेच सगळ्यांनी कॉम्पुटर एर्गोनॉमिकस आत्मसात केले पाहिजे. पाठीचा कणा नीट ठेऊन काम करता येईल असे बसले पाहिजे. 
  • आणि अगदी लहान वयात जेव्हा मुलामलींना अनुभवाधिष्टित शिक्षण दिले जाण्याची गरज असते तेव्हा त्यांना पालकांनी आणि शिक्षकांनी  पुस्तकांचा अनुभव जरूर द्यायला हवा.
  • चित्र आणि अक्षर भावना निर्माण करतात, खरी पुस्तके थोड्या जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन वाढवतात, खरा फील देतात. त्या पुस्तकांमधील चित्र इत्यादी मुलांच्या कल्पना शक्तीला, विचारशक्तीला आणि भावनांना व्यक्त कसे  करता येत त्याच शिक्षण कमी वयात मिळू शकत. त्या त्या पुस्तकांमधील पात्र, वस्तू जर न्याचरली अनुभवास ह्या वयात देता आली तर खूपच उत्तम. 
  • जाता जाता मी एवढेच म्हणेन कि, दोन्हीही ही बाजू लक्षात घेतल्यास खूप अवघड नाही. भरपूर पुस्तके वाचा, कारण वाचाल तर वाचाल. इ- पुस्तके वाचत असतांना वाचनाची क्षमता कशी वाढवता येईल ह्याकडेही लक्ष असू द्या. दर्जेदार वाचा. माझे बरेचसे क्लाएंट्स मला सांगतात कि इ बुक्स वाचतांना त्यांचं पूर्वी जस कॉन्सन्ट्रेशन व्हायचं तस होत नाही. तस असल्यास ते डिजिटल बुक्स मुळेच आहे कि कशामुळे ते जरूर तपासून घ्यायाला हवे. त्याबरोरच जर आपण ए बुक्स कडून प्रत्यक्ष पुस्तकांकडे आलात तर एकाग्रता वाढेल.  दर वर्षी डोळे तपासणी करून घ्यायाला हवी. 

  गोष्टीवेल्हाळ आपली संस्कृती आहे जिजामातोश्रीं पासून तर विनोबाजी भावे, प्रबोधनकार ठाकरे ह्यांचा सगळ्यांचा वारसा आपल्याला लाभला आहे, ह्या गोष्टी वेल्हाळ संस्कृती चे श्रेय हे वाचन वेल्हाळ संस्कृती मध्ये आहे. आणि आपण सगळे आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी सांगणार त्यावरून लक्षात येत कि आपलं वाचन किती, काय आपण वाचतो. "म्याकलेलँड" ह्या मानसतज्ञाने असे सांगितले आहे कि त्या त्या संस्कृतीतील व्यक्ती अशा का घडल्या आहेत त्याचे मूळ हे त्यांना कोणत्या गोष्टी लहानपणी  सांगितल्या गेल्या आहेत त्यात दडलेले असते. उगाच शिवाजी महाराज असे निर्माण झालेले नाहीत. त्यामुळे आपण वाचन वाढवूया मग ते "इ-वाचन" असेल किंवा "प्रत्यक्ष पुस्तक वाचन" असेल त्याने आपण पुढील पिढी घडवणार आहोत, पुढील पिढीला गोष्टी सांगायच्या असतील आणि त्यांना त्याद्वारे इतिहाचाची, आपल्या संस्कृतीची, माहिती मिळणार असेल आणि त्यांचे  विचार, भावना, कृती त्यांचे व्यक्तिमत्त्व जर त्यातुन घडणार असेल तर ती त्यांना मार्गदर्शक ठरतील. असे आपण वाचूया. आणि त्यासाठी ग्रंथालये हवीत. 

   

  धन्यवाद आपण मला ह्या सुंदर कार्यक्रमात बोलावलंय माझे विचार मांडण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल. आणि आपल्या पुढील वाटचाली साठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.  

   

   

   

   

Comments

 • (no comments)

Post Comments

This website is created and hosted by Website.com's Site Builder.